Sthanpothi |स्थानपोथी

  • ₹100/-

  • Ex Tax: ₹100/-


डॉ. व. दि. कुलकर्णी हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. याचा परिणामस्वरूप ते जिथे जिथे जात तिथल्या तिथल्या समग्र चेतन-अचेतन आसमंताशी त्यांचा एक मनोसंवाद प्रस्थापित होई. ‘स्थानपोथी’ हा त्यांचा ललितलेखांचा संग्रह म्हणजे व. दिं. नी अनेक स्थळांशी केलेला हृदय संवादच. ‘स्थानपोथी’तले सारेच लेख व. दिं.च्या नेहमीच्या शांत, संयत, विलोभनीय शैलीत अवतरलेले आहेत. ‘स्थानपोथी’त कराची, पुणे, बार्शी, गोवा, कोल्हापूर, मातापूर, उर्फ माहूर, रहिमतपूर इत्यादी नवीजुनी, ग्रामीण, अर्धग्रामीण अन् शहरी, प्रसिद्ध तशीच अप्रसिद्ध स्थानके चैतन्य धारण करून येतात. एखाद्या महानुभाव मठात गेलेले व. दि. थेट महानुभवांच्या मनातच उतरतात, तर ‘वाकडी’च्या आडवाटेने जाताना ते स्वातंत्र्यपूर्व काळातल्या ग्रामजीवनातील सरळ, स्निग्ध नातेसंबंध पाहून मनोमन सुखावतात. प्रस्तुत ललितलेखसंग्रह म्हणजे डॉ. व. दि. कुलकर्णी नावाच्या संवेदनशील समीक्षकांची ‘मनपोथी’च आहे. व. दिं. चे चरित्र आणि चारित्र्य कसकसे घडत गेले, स्वत: व. दिं. ने ते कसे प्रयत्नपूर्वक घडवले याचा एक सरल, उन्नत आणि प्रसन्न आलेख इथे पाहावयास मिळतो. ‘री-लिव्हिंग द एक्स्पिरियन्स’ पद्धतीचे व. दिं. चे हे सारे लेख वाचकांना भावसमृद्ध करतील.

Write a review

Please login or register to review